Advertisement

सेना-भाजपमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर


सेना-भाजपमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर
SHARES

विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीवरून भाजपनं दोन्ही सभागृहं डोक्यावर घेतली. मात्र भाजपची ही मागणी चुकीची ठरवत शिवसेनेनं या प्रकरणाची आधी चौकशी व्हावी, मगच बोलावं, असा टोला पहारेकरी भाजपला लगावला. त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर अाले अाहेत.



धनंजय मुंडे यांनी मागितली लाच

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न लावण्यासंदर्भात एका व्यक्तीकडे लाच मागितल्याचे वृत्त एका दूरचित्रवाहिने काल संध्याकाळी प्रसारित केले. तो धागा पकडत विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यावर विधानपरिषदेतही गोंधळ झाला. मात्र नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडताना त्यांची पाठराखण केली. 



नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले सवाल

सायबर एक्स्पर्टकडून एकसारखे आवाज काढले जातात, मग त्याची फॉरेन्सिक चाचणी का केली जात नाही, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला. माध्यमांच्या या प्रकारामुळे आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आज विधिमंडळावर सेटलमेंटचा गंभीर आरोप होत आहे. उद्या कुणीही कुणावरही आरोप करेल. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेनं एका बाजूने त्यांची पाठराखणच केली, अशी चर्चा होत अाहे. एका बाजूला भाजप आमदाराकडून धनंजय मुंडे यांच्या निलंबनाची मागणी होत असताना सेनेकडून पाठराखण केली जात असल्याने भाजप सेनेमधील वाद पुन्हा समोर आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा