Advertisement

मुंबईत २ जूनपासून रंगणार फिनटेक महोत्सव


मुंबईत २ जूनपासून रंगणार फिनटेक महोत्सव
SHARES

मुंबई येथे जागतिक ‘फिनटेक हब’ उभारण्याचं उद्दिष्ट राज्य शासनानं ठेवलं असून त्यानिमित्ताने ट्रायडंट हाॅटेल इथं २ अाणि ३ जून रोजी ‘फिनटेक’ महोत्सवाचं अायोजन करण्यात अालं अाहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत अायोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.


अायटी क्षेत्राची माहिती मिळणार

या परिषदेत फिनटेक क्षेत्रातील स्टार्ट-अप, विद्यार्थी आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या अभिनव कल्पना आणि उपाय, फिनटेक क्षेत्रातील बदलत्या संधी याची माहिती मिळणार आहे. तसेच बँक, वित्तीय सेवा संस्था, तंत्रज्ञान कंपन्या, माध्यमे आणि गुंतवणुकदार यांच्यासह प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी मिळणार आहे.


अनेक विषयांवर होणार चर्चा

या महोत्सवामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार असून त्यामध्ये वित्तीय सेवा उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था आणि शासनाचा सहभाग असणार आहे. भारतातील बाजारपेठ या विषयांतर्गत भारतातील फिनटेक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने, जागतिक बाजारपेठ एक दृष्ट‍िक्षेप, या क्षेत्राशी संबंधित आर्थिक बाबींचा उहापोह, ‘स्केलिंग अप रेगटेक’-नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेले बदल आणि आव्हाने या विषयांवर चर्चा होणार आहे.


हेही वाचा -

नेदरलॅण्डची राणी डबेवाल्यांना भेटणार!

झोपेतून उठवलं म्हणून डॉक्टरने रुग्णाचं डोकं फोडलं!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा