नेदरलॅण्डची राणी डबेवाल्यांना भेटणार!

बुधवारी दुपारी १ वाजता अंधेरी रेल्वे स्थानकात राणी मॅक्झिमा डबेवाल्यांची भेट घेणार आहे. राणी मॅक्झिमाच्या भेटीमुळे डबेवाल्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच डबेवाल्यांनी राणीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे.

नेदरलॅण्डची राणी डबेवाल्यांना भेटणार!
SHARES

प्रिन्स चार्ल्सच्या भेटीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅनेजमेंट गुरू अशी ओळख असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेणाऱ्या हायप्रोफाईल मान्यवरांची लिस्ट वाढतच चालली आहे. या लिस्टमध्ये आता नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा यांचाही समावेश होणार आहे.


कधी, कुठे होणार भेट?

बुधवारी दुपारी १ वाजता अंधेरी रेल्वे स्थानकात राणी मॅक्झिमा डबेवाल्यांची भेट घेणार आहे. राणी मॅक्झिमाच्या भेटीमुळे डबेवाल्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच डबेवाल्यांनी राणीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे.


शाही लग्नात आहेर

इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांनी २००३ मध्ये डबेवाल्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून डबेवाल्यांचं इंग्लंडच्या राजघराण्याशी आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. डबेवाल्यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या शाही लग्नसमारंभात मराठमोळा आहेरही पाठवला होता.

इंग्लडच्या राजघराण्याप्रमाणेच नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा यांनाही डबेवाल्यांचं आकर्षण आहे. त्यामुळेच भारतदौऱ्यावर असलेल्या राणी मॅक्झिमा यांनी डबेवाल्यांसोबत भेट ठरवली.

मुंबई डबेवाला असोसिएशनला पोलिसांकडून या भेटीसंदर्भातील पत्र मिळाल्याची माहिती असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


पारंपरिक स्वागत

डबेवाले नेदरलॅण्डच्या राणीचं पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करणार आहेत. राणीला भेट म्हणून डबेवाल्यांकडून एक जेवणाचा डबाही देण्यात येईल, असं तळेकर यांनी सांगितलं. त्यामुळे बुधवारच्या भेटीकडेचं डबेवाल्यांसह सामान्य मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा-

आंबाविक्रीची स्मार्ट आयडिया! शेतकरी-मुंबईचे डबेवाले आले एकत्र

उरलेलं अन्न फेकू नका, रोटी बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा...संबंधित विषय