Advertisement

आंबाविक्रीची स्मार्ट आयडिया! शेतकरी-मुंबईचे डबेवाले आले एकत्र

आंब्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला वर्षभर मेहनत घ्यावी लागते. पण अनेकदा त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळावा आणि शेतातील पिकलेल्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी आंबा विक्रीची स्मार्ट आयडिया एका शेतकऱ्याने सूचवली आहे.

आंबाविक्रीची स्मार्ट आयडिया! शेतकरी-मुंबईचे डबेवाले आले एकत्र
SHARES

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा वर्षातून एकदाच येतो. या फळाचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. लहान मुलंच काय हा आंबा मोठ्यांचादेखील "फेव्हरेट" आहे. याच आंब्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला वर्षभर मेहनत घ्यावी लागते. पण अनेकदा त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळावा आणि शेतातील पिकलेल्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी आंबा विक्रीची स्मार्ट आयडिया एका शेतकऱ्याने सूचवली आहे.



कोण आहे हा शेतकरी?

महाराष्ट्रातल्या जालना येथील अंबड या जिल्ह्यातील राहुल मुरलीधरन नावाच्या शेतकऱ्याने आंबे विकण्याचा एक स्मार्ट उपाय अंमलात आणला आहे.


काय आहे ही भन्नाट कल्पना?

सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या भारतीय आंब्याचा परदेशी जसा आस्वाद घेतात त्याचप्रमाणे भारतीयांना देखील सेंद्रिय आंब्याची चव चाखता यावी आणि याच धोरणाने राहुल यांनी मुंबईच्या डबेवाल्यांसोबत त्यांचे आंबे घराघरात पोहचवण्याची ही भन्नाट कल्पना आणली आहे.


म्हणून ही आयडिया सुचवली

कडाक्याचा उन्हाळा, बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे सध्या फळे आणि भाजीपाला यांवर परिणाम होताना दिसत आहे याचा फटका फळाच्या राजालाही बसत आहे. आंब्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तर याच्या लागवडीसाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांना मुंबईतील मुख्य बाजारपेठेशी संबंध येत नाही. उन्हाळ्यात बाजारपेठेत आंबा विकण्यासाठी येतो पण नेहमीच व्यापारी शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल खरेदी करून तोच माल व्यापारी जास्त भावात बाजारात विकतो. परिणामी ज्या शेतकऱ्याने आंब्यासाठी मेहनत घेतलेली असते त्या शेतकऱ्याला आंब्याचा पाहिजे तसा मोबदला मिळतच नाही आणि व्यापारी मात्र बक्कळ पैसे कमावून जातो.

आंबा विकण्याची स्मार्ट पद्धत

आजच्या रसायनयुक्त जगात प्रत्येक फळांवर औषध फवारणी केलेली आढळते, त्यामुळे फळे दिसताना टवटवीत वाटतात पण आतून तितकेच खराब आणि आरोग्यास घातक असतात. शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला असतो पण त्यानंतर त्यावर नको ती औषध फवारणी होते परिणामी त्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळे मुरलीधरन यांनी आंबा विकण्यासाठी एक स्मार्ट पद्धत अमलात आणली आहे.

प्रत्येक डब्यात एक आंबा देऊन मुंबईच्या प्रत्येक घरात हे डबेवाले पोहचवत आहेत. आणि ज्यांना हा आंबा आवडला त्यांनी सोबत दिलेल्या पॅम्प्लेटवरील नंबरवर संपर्क करून त्या आंब्याची ऑर्डर त्यांना करता येणार आहे. आतापर्यंत २५ हजार घरात हा आंबा पोहचला असून १ लाखाचा पल्ला पार करणार.

-सुभाष तळेकर,  प्रवक्ते, मुंबई डबेवाला असोसिएशन  

संपूर्ण जगभरात ४३.३ टक्के आंब्याची लागवड ही भारतात होते. हा आकडा सर्वात मोठा आहे. भारतातील आंबा जगप्रसिद्ध आहे आणि म्हणूनच तो फळांचा राजा आहे. जगात या आंब्याची चव चाखली जाते पण केवळ आपल्या भारतात याला मार्केट नाही याची खंत आहे. भारतीयांनादेखील त्यांचाच आंबा खाता यावा या एकाच उद्देशाने आम्हाला ही कल्पना सुचली आणि ही कल्पना अंमलात आणण्यातदेखील यश आलं.
- राहुल मुरलीधरन, शेतकरी

नैसर्गिकरित्या वाढवलेले हे आंबे मुंबईकरांना चाखता यावे यासाठी राहुल मुरलीधरन आणि मुंबईच्या डबेवाल्यांची ही स्मार्ट कल्पना खऱ्या अर्थाने हटके आहे, यात शंका नाही. 


हेही वाचा - 

बोरीवलीत हमाल, डबेवाल्यांसाठी वाचनालय

इट्स आमलिशियस! आंब्याचे तब्बल १५० पदार्थ!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा