Advertisement

राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! चर्चा तर होणारच

राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत आहे.

राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! चर्चा तर होणारच
SHARES

घाटकोपरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले आहेत. या लावलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे  हिंदुहृदयसम्राट असं लिहलं आहे. 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट असे म्हणत. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे.

घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट लावण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी महानगर पालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक देखील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकांसाठी मनसेनं देखील हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील अॅक्टीव्ह झाल्याचं दिसत आहे.



हेही वाचा

मुंबईतील भाजपविरोधातील आंदोलन काँग्रेसनं थांबवलं

आगामी लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा