Advertisement

आगामी लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार - संजय राऊत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे संकेतच राऊत यांनी दिले.

आगामी लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार - संजय राऊत
SHARES

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना देशभर लढवणार असल्याचं पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे आणि राऊत हे नुकतेच गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपवून मुंबईत परतले आहेत.

यावेळी रविवारी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगितलं की, आता लवकरच आदित्य उत्तर प्रदेशच्या मोहिमेवरही निघणार आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सरकार स्थापन करतील असा दावा करतानाच शिवसेना आदित्य यांच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी येत्या लोकसभा निवडणुकीत उतरेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

मानेवरील शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे पूर्वीच्या जोमानं अद्यापही सक्रिय नाहीत. त्यामुळे नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आदित्य यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे संकेतच राऊत यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या नेतृत्वाविषयी आदित्य यांना रविवारी नागपुरात विचारले असता त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि सेना नेते आणि शिवसैनिकांच्या सहकार्यानं लोकसभेच्या निवडणुका लढवू, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात डोळे बंद करून फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं? असा प्रश्न उपस्थित करत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आलं आहे.” असं म्हणत टोलाही लगावला आहे.



हेही वाचा

निवडणुकीत आम्ही 'किंग मेकर' नाही, 'किंग' बनणार - बाळा नांदगावरकर

'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना...'; जामीनावर बाहेर येताच नितेश राणेंचा इशारा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा