Advertisement

मुंबईतील भाजपविरोधातील आंदोलन काँग्रेसनं थांबवलं

भाजपनं गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

मुंबईतील भाजपविरोधातील आंदोलन काँग्रेसनं थांबवलं
SHARES

काँग्रेसनं भाजपविरोधात पुकारलेले आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भाजपनं गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आज भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला असं त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिला होता.

'सागर' बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम होते. आम्ही १०० ते १५० कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आंदोलन करू पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी झाले.

तर, दुसरीकडे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मिहीर कोटेचा, आमदार राम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप आंदोलनाच्या बाजूनं सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान झालेला भाजपला चालतो. मात्र, महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या पंतप्रधानांचा निषेध राज्यातील भाजप नेते घेत नाहीत. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल. मात्र, मोदींविरोधात बोलणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. आज भाजपचा महाराषेटेरद्रोही चेहरा उघड झाला असल्याची कठोर टीका नाना पटोले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. राज्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी आमची साधी मागणी असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं.



हेही वाचा

आगामी लोकसभा निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार - संजय राऊत

'मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना...'; जामीनावर बाहेर येताच नितेश राणेंचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा