Advertisement

बालभारतीचे कॉपीराईट राज्य सरकार घेणार


बालभारतीचे कॉपीराईट राज्य सरकार घेणार
SHARES

दहावीचं बालभारती पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉटस-अॅपवर व्हायरल झालं. सरकारनं खबरदारी न घेतल्यामुळं ही घटना घडल्याबाबत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी जाब विचारला असता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापुढे राज्य सरकार बालभारती पुस्तकाचं कॉपीराइट घेणार आहे. त्यामुळे २१ अपेक्षित यांसारख्या गाईडना पुस्तके काढण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. क्लासेसनाही सरकारची परवानगी घेतल्याशिवाय पुस्तकं छापता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.


खासगी पुस्तक विक्रेत्यांची चौकशी

याप्रकरणी पाठ्यपुस्तक मंडळाच्या सात ते आठ व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून ५ ते ६ खासगी पुस्तक विक्रेत्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी बालभारती यांच्यामार्फत प्रकाशित होणारी सर्व पुस्तके व पाठ्यपुस्तकं आदी सर्व प्रकाशनाचे कॉपीराईट महाराष्ट्र शासनाकडे कायमस्वरूपी घेण्यात येणार आहेत. जेणेकरुन अनुमती घेतल्याशिवाय कोणताही खासगी पुस्तक विक्रेता बालभारतीच्या कोणत्याही पाठ्युपस्तकांची छपाई करू शकणार नाही, असंही तावडे यांनी आज स्पष्ट केलं.


विरोधी पक्षांनी केली लक्षवेधी सूचना

राज्यातील इयत्ता दहावीचं बालभारतीचं संपूर्ण पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉटस-अपवर व्हायरल झाल्याबद्दलची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू, आशिष शेलार, विजय वड्डेटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आदी सदस्यांनी उपस्थित केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा