Advertisement

बेरोजगारांसाठी खूशखबर : ३६ हजार जागांसाठी लवकरच जाहिरात


बेरोजगारांसाठी खूशखबर : ३६ हजार जागांसाठी लवकरच जाहिरात
SHARES

राज्यातील बेरोजगार तरुण, तरुणींसाठी अानंदाची बातमी अाहे. राज्यात मेगा भरती होणार असून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी बेरोजगारांना मिळणार अाहे. यंदा तब्बल ३६ हजार रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अाहे. ३१ जुलैपर्यंत राज्यातील सर्वच विभागात रिक्त असलेल्या पदांची जाहिरात निघणार आहे. राज्यातील सर्व विभागांना रिक्त पदाची माहिती १७ जुलैपर्यंत राज्य सरकारला द्यावी लागणार आहे.  

ह्या विभागात असणार भरती 

ग्रामविकास विभागात ११  हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागात १० हजार ५६८, गृह विभागात ७ हजार १११, कृषी विभागात २ हजार ५७२, पशुसंवर्धन विभागात १ हजार ४७,  सार्वजनिक बांधकाम विभागात ८३७, जलसंपदा विभागात ८२७, जलसंधारण विभागात ४२३, मत्स्यव्यवसाय विकास विभागात ९० अाणि नगरविकास विभागात १ हजार ६६४ पदे भरण्यात येणार अाहे. 


एकाच दिवशी परीक्षा 

या जागा भरण्यासाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा  होणार आहे. ही पदे भरण्यासाठी निवड समित्या स्थापन करण्यात अाल्या अाहेत. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय  स्तरावर आयुक्त तर राज्यस्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख या समितीत असणार आहेत.

७२ हजार पदे रिक्त

शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा अाहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत अाहे. या जागा भरण्याची मागणी कर्मचारी व अधिकारी संघटनांनी केली अाहे. या मागणीची दखल घेऊन मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण रिक्त जागांपैकी ७२ हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अाता पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा - 

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून महादेव जानकरांना पुन्हा संधी

लाड यांनी ठोकला काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा