Advertisement

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून महादेव जानकरांना पुन्हा संधी


विधानपरिषदेसाठी भाजपाकडून महादेव जानकरांना पुन्हा संधी
SHARES

 विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असंच सध्याचं तरी चित्र आहे. सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपातर्फे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर तसेच माजी राज्यमंत्री विजय ऊर्फ भाई गिरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक यांनाही भाजपाने उमेदवारी जाहीर दिली अाहे.


काँग्रेसकडून पुन्हा रणपिसे 

काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आणि शरद रणपिसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रणपिसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनंही विधानपरिषदेसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. अॅड. अनिल परब आणि मनीषा कायंदे यांची नावे निश्चित असून, फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

भाजपाला सर्वाधिक जागा

ही निवडणूक बिनविरोध झाली तर संख्याबळानुसार भाजपाचे ५, शिवसेना अाणि काँग्रेसचे प्रत्येकी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार निवडून येईल. तर ११ वी जागा शेकापचे जयंत पाटील लढतील. सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील असा अंदाज आहे. 



हेही वाचा - 

लाड यांनी ठोकला काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा