हजारो बेरोजगारांना मिळाली नोकरी

 Malad West
हजारो बेरोजगारांना मिळाली नोकरी
हजारो बेरोजगारांना मिळाली नोकरी
See all

दिंडोशी - नामांकित आयटी कंपन्या, बँका, हॉटेल, हॉस्पिटल आणि एअरपोर्टसारख्या आघाडीच्या आस्थापनांमध्ये हजारो बेरोजगारांना रविवारी लगेच नोकरी मिळाली. निमित्त होतं शिवसेना, युवासेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे संतोषनगर दिंडोशी येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे. या मेळाव्यात पाचवी ते एमबीए, इंजिनीअर पदवीधर उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन नियुक्ती पत्रे देण्यात आली.

आमदार सुनील प्रभू आयोजित या जॉब फेअरमध्ये शिवसेनेतर्फे दिंडोशी विभागात घरोघरी जाऊन बेरोजगार युवकांना नोकरीच्या फॉर्मचं वाटप करण्यात आलं होतं. या वेळी नगरसेवक प्रशांत कदम, सायली वारीसे, मनीषा पाटील, रीना सुर्वे, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, सुहास वाडकर, माजी नगरसेवक गणपत वारीसे, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक पूजा चौहान, शाखाप्रमुख संदीप जाधव, भाई परब, कृष्णा देसाई, संदीप गाढवे, सचिन पाटील, सदाशिव पाटील, सुनील गुजर, प्रशांत मानकर आदी उपस्थित होते.

Loading Comments