Advertisement

मुलुंडच्या एकाच वॉर्डमधून मनसेची रस्सीखेच


मुलुंडच्या एकाच वॉर्डमधून मनसेची रस्सीखेच
SHARES

मुलुंड - वॉर्ड क्रमांक 105 हा महिलांसाठी राखीव झाला आहे. तर वॉर्ड क्रमांक 106 हा खुला आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 106 मधून अनेक जण उमेदवारीसाठी हिरीरीने प्रयत्न करत आहेत. या वॉर्डमध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुजाता पाठक या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे यंदाही याच वॉर्डमधून उमेदवारी मिळवण्यासाठी त्या उत्सुक आहेत. तर वॉर्ड 105 महिलांसाठी आरक्षित असल्याने मनसेचे नेते सत्यवान दळवी आणि सागर देवरे देखील वॉर्ड 106 मधूनच उमेदवारी मिळावी अशाच प्रयत्नात आहेत. यामुळे एकाच पक्षातल्या या तिघांची एकाच वॉर्डसाठी रस्सीखेच सुरू आहे. तेव्हा वॉर्ड 106 मधून मनसे नेमकी कुणाला उमेदवारी देते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा