• तिकीट वाटपाआधीच काँग्रेसमध्ये जुंपली
  • तिकीट वाटपाआधीच काँग्रेसमध्ये जुंपली
  • तिकीट वाटपाआधीच काँग्रेसमध्ये जुंपली
SHARE

मालवणी - येथील वॉर्ड क्रमांक 33 मधील व्हिलेज मालवणी येथे तिकीट वाटपाआधीच काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. काँग्रसचे इच्छुक उमेदवार ओम कुमावत यांनी तर तिकीट कापल्याची कुणकुण लागलाच आमदार असलम शेख यांच्या कार्यालयामोर धरणं दिलं. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान 'अद्याप काँग्रेसची यादी जाहीर झाली नाही तर कुमावत यांना तिकीट कापल्याचे कुणी सांगतिलं?  त्यांच्या नावाचा विचार नक्की केला जाईल' असे असलम शेख यांनी सांगितले. तर दुसरीकरडे 30 जानेवारीपर्यंत निर्णय समजेल मला असलम शेख यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत ओम कुमावत यांनी आपलं धरणं मागे घेतलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या