Advertisement

आरेच्या निर्णयाचं दु:ख झालं, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका : उद्धव ठाकरे

शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला.

आरेच्या निर्णयाचं दु:ख झालं, मुंबईच्या  पर्यावरणाशी खेळू नका : उद्धव ठाकरे
SHARES

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधला. नव्या सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

"महाराष्ट्र सरकारच्या मेट्रो कारशेडला आरे कॉलनीत स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे दुःख झाले", असं ते म्हणाले.

मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

लोकशाही वाचवण्याची वेळ आली

यासोबतच उद्धव ठाकरे म्हणाले की, "लोकशाहीला चार खांब असतात, लोकशाही वाचवण्यासाठी या सर्व खांबांना एकत्र यावे लागेल, लोकशाही वाचवायची आहे, मतदारांचा बाजार असा मांडला तर हे चुकीचे आहे, मतदार हरतील. लोकशाहीवर विश्वास."

महाराष्ट्रातील सत्ता बळकावण्यासाठी हे रातोरात नाटक

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी हे संपूर्ण नाटक भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी केले. मी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा