आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या वतीनं चेंबूरमध्ये निषेध रॅली


  • आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या वतीनं चेंबूरमध्ये निषेध रॅली
  • आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या वतीनं चेंबूरमध्ये निषेध रॅली
SHARE

चेंबूर - मुंबईमधील आंबेडकरवादी स्टुडंट्स असोसिएशनच्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत चेंबूरच्या टाटा सामाजिक संस्थान ते आंबेडकर उद्यानापर्यंत शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात शिकत असलेल्या बारा विद्यार्थ्यांच्या निलंबनाविरोधात 26 डिसेंबरला जेएनयूमध्ये अकादमी परिषदेसमोर विद्यार्थ्यांनी काही मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. यानंतर या विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबित करण्यात आलं होतं. हे निलंबन अन्यायकारक असून या विद्यार्थ्यांना परत विद्यालयात घ्यावे तसेच त्यांनी केलेल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी कन्हैयालाल आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर देखील सडकून टीका केली. तर या मोर्चात बाहेरील आंबेडकरी विचारसरणीच्या आंदोलकांनी देखील सहभाग घेतला होता. या प्रकरणी आझाद मैदानातही आंदोलन करणार असल्याचा इ्शारा या विद्यार्थ्यांनी दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या