एमआयएमच्या रॅलीमुळे ट्रॅफिक जाम

 Bhendi Bazaar
एमआयएमच्या रॅलीमुळे ट्रॅफिक जाम
Bhendi Bazaar, Mumbai  -  

भेंडीबाजार - पालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आपलं नशीब आजमावत पहिल्यांदाच मुंबई पालिका निवडणूक लढवणार असलेल्या एमआयएमने शुक्रवारी मोहम्मद अली रो़डहून भव्य प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीत एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारिस पठाण, मुंबई अध्यक्ष शकीर पटनी यांनी सहभाग घेतला होता. मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही रॅली काढल्याने मोहम्मद आली रोड, चकाला स्ट्रीट इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Loading Comments