भायखळ्यात प्रचारामुळे ट्रॅफिक जाम

Byculla
भायखळ्यात प्रचारामुळे ट्रॅफिक जाम
भायखळ्यात प्रचारामुळे ट्रॅफिक जाम
भायखळ्यात प्रचारामुळे ट्रॅफिक जाम
See all
मुंबई  -  

भायखळा - रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भायखळा, माझगाव, कामाठीपुरा, नागपाडा येथे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली. भाजपाचे वॉर्ड क्रमांक 211 चे उमेदवार रोहितदास लोखंडे आणि 207 च्या उमेदवार सुरेखा लोखंडे यांच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. तर काँग्रेसच्या वॉर्ड क्रमांक 210 च्या उमदेवार सोनाली जामसुतकर यांच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली होती. रविवार हा निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावून शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र यामुळे सामान्य माणसांचे खूप हाल झाले सर्वच पक्षाच्या प्रचार फेऱ्या आणि रोड शोमुळे बाबुराव जगताप मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, आर्थर रोड आणि के के मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.