Advertisement

50 दुचाकीस्वारांवर कारवाई


50 दुचाकीस्वारांवर कारवाई
SHARES

वांद्रे - पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री बाईक रायडिंग करताना तरुणाच्या मृत्यूनंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी सोमवारी रात्री वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांनी 3 तासांत सुमारे 50 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
या सर्व दुचाकीस्वारांना 100 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत दंड ठोठावलाय. शनिवारी रात्री पश्चिम द्रुतगती मार्गावर बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलिसांनी कलानगर चौक आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे नाकाबंदी सुरु केली होती. वेग मर्यादेचं उल्लंघन, ट्रिपलसीट, तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर या वेळी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा