Advertisement

संपर्क अभियान : सलीम खान, सलमान खानला भेटले गडकरी

भाजपाच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानार्तंगत नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत अभिनेता सलमान खान अाणि सलीम खान यांची त्यांच्या घरी भेट घेतली.

संपर्क अभियान : सलीम खान, सलमान खानला भेटले गडकरी
SHARES

भाजपाच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानार्तंगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत अभिनेता सलमान खान अाणि जेष्ट्य पटकथाकार सलीम खान यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी त्यांना संपर्क अभि‍यानाची पुस्तिका भेट दिली.

या भेटीअगोदर सलीम खान यांनी म्हटले होते की, नितीन गडकरी हे भेटायला येणार असल्याचं मला गुरूवारी समजलं. त्यामुळं मी खूप खूश अाहे. मी त्यांना कधी वैयक्तिक भेटलो नव्हतो. त्यामुळं त्यांना भेटून मला खूप अानंद होणार अाहे.


२९ मे पासून अभियान सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपानं २९ मे पासून 'संपर्क फॉर समर्थन' अभियान सुरू केलं अाहे. या अभियानात देशातील प्रसिद्ध व्यक्तींना भेटून मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामाची माहिती दिली जाणार अाहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा या अभियानात देशातील ५० मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार अाहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहीत ४ हजार कार्यकर्ते मोदी सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार अाहेत.हेही वाचा -

स्वाभिमान पक्ष सर्व निवडणुका लढणार - खा. नारायण राणे

जनतेकडं समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडं नाही - विखे पाटीलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement