SHARE

कांदीवली - वॉर्ड क्रमांक 22 मधील बिहारी टेकजी रमेश झा कम्पाऊंडमध्ये मकर संक्रातीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी हजेरी लावली होती. सात हजार लोकांनी दही, चिवडा, भाजी, चटणीच्या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संजय निरूपम यांनी आपल्या समाजाचे काही लोक काँग्रेसपासून लांब जात आहेत त्यांना जवळ आणण्यासाठी इकडे आलो अशी प्रतिक्रिया दिली. तसेच लोकांना एकत्र आणने हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे यावेळी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या