मनसेतील इच्छुकांचा उमेदवारीसाठी वाद


  • मनसेतील इच्छुकांचा उमेदवारीसाठी वाद
  • मनसेतील इच्छुकांचा उमेदवारीसाठी वाद
SHARE

भांडुप - भांडुप विधानसभा मतदार संघातील मनसेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. त्यामुळे मनसेतील पक्षांतर्गत राजकारण येत्या काही दिवसांत तापण्याची शक्यता आहे.

भांडुप विधानसभा मतदार संघामध्ये मनसेच्या दोन महिलांसह एक पुरूष असे एकूण तीन नगरसेवक आहेत. हे नगरसेवक कार्यरत असलेल्या वॉर्डचे विभाजन होऊन दोन वार्ड खुले झाले. तर या विभागातील इतर पाच वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खुल्या वॉर्डमधून मनसेच्या पुरूष पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. दोन्ही नगरसेविका, वैष्णवी सरफरे, अनिषा माजगावकर यांनी याला विरोध करत वॉर्ड ११५ आणि  वॉर्ड११४ मधून आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा हट्ट धरला आहे. ११५ वॉर्डमधून स्वयंघोषीत शाखाध्यक्ष अनिल राजभोज आणि राजेश फडतरे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. तर नगरसेविका अनिषा यांनी दुसऱ्या वॉर्डातून निवडणूक लढावी असे सांगत, मनसेचे भांडुप विधानसभा अध्यक्ष योगेश सावंत यांनी ११४ मधून आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे. महिला नगरसेविकांनी आपल्याला याच वॉर्डातून तिकीट न मिळाल्यास निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे भांडुपमधील मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या