• एका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी
  • एका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी
  • एका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी
  • एका शिलेदारीसाठी चौघांची दावेदारी
SHARE

काळबादेवी - शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेचही सुरु झाली आहे. शिवसेना प्रभाग क्रमांक 220 मध्येही असंच चित्र पाहायला मिळत आहे. सी विभागातील प्रभाग क्रमांक 220 हा आरक्षित नसल्याने येथून दावेदारांची संख्याही वाढली आहे.

या वॉर्डमधून शिवसेनेच्या युगंधरा साळेकर, शाखाप्रमुख वैभव मयेकर आणि उपशाखा प्रमुख उदय निगुडकर हे तिघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या युगंधरा साळेकर येथील नगरसेविका आहेत.

डी विभागातील प्रभाग क्रमांक 215 हा महिलांसाठी राखीव झाला अाहे. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक सुरेंद्र बागलकर हे देखील 220 प्रभागातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. यामुळे एकाच पक्षातल्या चौघांनी या प्रभागासाठी रस्सीखेच सुरू केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या