Advertisement

भाजपाच्या 'पारदर्शकते'ला शिवसेनेचे 'वास्तववादी' उत्तर


भाजपाच्या 'पारदर्शकते'ला शिवसेनेचे 'वास्तववादी' उत्तर
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पावरून शिवसेना आणि भाजपाकडून राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात झाली आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी येणारा अर्थसंकल्प वाढवून तसेच फुगवून न आणता वास्तववादी असावा, अशी मागणी केली आहे. तर भाजपानेही अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ नसावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपाच्या पारदर्शकतेच्या मुद्दयाला शिवसेनेकडून वास्तववादी मुद्दयाने उत्तर दिले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सन 2017-18चा अर्थसंकल्प येत्या 29 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त अजोय मेहता हे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर करणार आहेत. मात्र, हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून अर्थसंकल्प हा वास्तववादी असावा. कोणत्याही प्रकारे निधी वाढवून तसेच फुगवून अर्थसंकल्प बनवू नये, अशी सूचना महापौरांनी केली. परंतु दुपारी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅडवोकेट आशिष शेलार यांनीही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याची सूचना केली आहे. दरवर्षी पाणीपट्टी आणि त्याबरोबरच मलनि:सारण कर आणि पाण्याचे शुल्क आणि मलनि:सारण शुल्क, ट्रेड रिफुजल चार्ज यासारख्या कोणत्याही करात वाढ करण्यात येवू नये, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. अर्थसंकल्पाचे आकारमान वाढले पाहिजे, पण या वेळी कोणत्याही प्रकारची फुगीर रकमांची वाढ न दाखवता प्रत्यक्ष आकारमानाचे वास्तववादी चित्र असलेला सुटसुटीत मांडणीमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, असे शेलार यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पाचे आकारमान 11 हजार कोटींनी होणार कमी

मुंबई महापालिकेचा चालू अर्थसंकल्प 37 हजार 052 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मात्र, नव्याने सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे आकारमान खरोखर कमी होऊन सुमारे 26 हजार कोटी ते 27 हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल 11 हजार कोटींनी अर्थसंकल्पाची रक्कम केली जाणार आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प हा कर्ज, अनुदान तसेच इतर रक्कम दाखवून ती फुगवून दाखवली जाते. परंतु नव्याने बनवल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जेवढा निधी खर्च होणार आहे, तेवढयाच निधीचा समावेश करून अर्थसंकल्प बनवला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा