भायखळ्यात भाजपात दोन गट ?

Mazagaon
भायखळ्यात भाजपात दोन गट ?
भायखळ्यात भाजपात दोन गट ?
भायखळ्यात भाजपात दोन गट ?
See all
मुंबई  -  

भायखळा - प्रभाग क्रमांक 207 मध्ये भाजपात दोन गट निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये एक गट भाजपा नेते रोहिदास लोखंडे यांचा आहे. तर दुसरा गट हा भाजपाच्या महिला मोर्चा महामंत्री मालती पाटील यांचा आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 207 हा महिला वॉर्ड म्हणून घोषित झाला असून, रोहिदास लोखंडे येथून पत्नी सुरेखा लोखंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मालती पाटील देखील 207 मधून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. या दोन्ही गटांकडून विभागात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. रोहिदास लोखंडे हे आधी काँग्रेसमध्ये होते. 2012 च्या पालिकेच्या निवडणुकीत ते प्रभाग क्र 204 (नवीन वॉर्ड 207) मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते. तर मालती पाटील याआधी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये होत्या. राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर रोहिदास लोखंडे आणि मालती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.