उद्धव ठाकरेंची सी विभागास भेट

 Girgaon
उद्धव ठाकरेंची सी विभागास भेट
उद्धव ठाकरेंची सी विभागास भेट
उद्धव ठाकरेंची सी विभागास भेट
उद्धव ठाकरेंची सी विभागास भेट
See all

गिरगाव - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व शिवसेना शाखांना भेट देत आहेत. सोमवारी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान त्यांनी सी विभागातील गिरगांव, कामाठीपुरा, कुमंभारवाडा या शिवसेनेच्या शाखांना भेट दिली. खुद्द पक्षप्रमुख शाखेत आल्यामुळं सर्व शिवसैनिकांची एकच झुंबड उडाली होती. उद्धव यांनी शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विभागात काम कसं सुरू आहे, याचा आढावा घेताला. कुंभारवाड्यातील नागरिकांशी संवाद साधून तिथल्या रहिवाशांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. या वेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, नगरसेवक युगंधरा साळेकर, माजी नगरसेवक हेमाताई शेट्टे, शाखाप्रमुख विक्रम धोत्रे, उपशाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

Loading Comments