'खंडणीचा पैसा सैनिकांना नको'

 Panaji
'खंडणीचा पैसा सैनिकांना नको'

पणजी  : ऐ दिल है मुश्‍किल चित्रपटाचा वाद अखेर निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या आश्‍वासनानंतर मिटवण्यात आला. परंतू, शहिदांच्या कुटूंबियांनी ही मदत घेण्यास नकार दिला आहे. त्यावरच बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याला स्वत:चा स्वाभिमान आहे. त्यांना खंडणीतून उकळलेला पैसा नको. म्हणून भारतीय सैन्याने पैसे घेणं नाकारलं, असा घणाघात मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

तसंच वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती मिळाली नाही. ते तिघं मिळून “ये तो होना ही था” असा एक चित्रपट काढणार आहेत,  अशी टीका उद्धव यांनी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावर केली.

Loading Comments