उद्धवना 'हार्दीक' शुभेच्छा...

  मुंबई  -  

  वांद्रे - गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या हार्दीक पटेल याने मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दरम्यान 'बाळासाहेब ठाकरे यांचा मी फॅन आहे त्यामुळे मातोश्रीवर आलो' असं हार्दीक पटेल याने सांगितले. मात्र मुंबई महानगर पालिका रणसंग्राम सुरू असताना हार्दीक मातोश्रीवर येणं म्हणजे मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी तर उद्धव ठाकरे यांची ही खेळी नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  गुजरातमध्ये हार्दीक पटेल याने भाजपाच्या नाकी नऊ आणले होते. त्यातच आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर गेली 25 वर्ष मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना-भाजपाने काडीमोड घेतलाय. विशेष म्हणजे मुंबईत पाटीदार समाजाचे कार्यक्रम हार्दीक पटेल करणार आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारसाठी आम्ही बांधील नाही आहोत. हे सरकार नोटीसवर सुरू आहे.एखाद्या गोष्टीत मन रमत नाही. नोटीसीची अंतिम तारीख लवकरच कळेल असं सांगत सरकारमधून बाहेर पडण्याचे त्यांनी संकेत दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.