Advertisement

३१ मे पर्यंत महाराष्ट्र ग्रीन झोन झालाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला कडक सूचना

मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या ३१ मे अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये रुपांतरीत झालाच पाहिजे, यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.

३१ मे पर्यंत महाराष्ट्र ग्रीन झोन झालाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला कडक सूचना
SHARES

महाराष्ट्रात कोराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केवळ राज्य प्रशासनच नाही, तर देशपाळीवरील यंत्रणा चिंताग्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या ३१ मे अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये रुपांतरीत झालाच पाहिजे, यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.   

महाराष्ट्राकडे लक्ष

सद्यस्थितीत देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ६७० वर जाऊन पोहोचली आहे, यातील १,३९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १२,९७५ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून त्यातील ८८०० रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहे. यातील ५४८ कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक असल्याने सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्राकडेच वेधलं गेलं आहे. 

हेही वाचा - सरकारने लावली खर्चांना कात्री, नवीन प्रकल्प, नोकरभरतीला लगाम!

रिझल्ट दिसला पाहिजे

या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसंच पोलीस ज्या पद्धतीने लाॅकडाऊनमधील परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसं नेता येईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप योग्य तो निर्णय घ्यावा. अंमलबजावणीत कुठल्याही प्रकारची कुचराई नको. येणाऱ्या काही दिवसांत मला ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन दिसलाच पाहिजे.

संसर्ग पसरता कामा नये

लॉकडाऊन लागू करणं सोपं असलं, तरी त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरू केले आहेत. परंतु याठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे-जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा