सत्तेला लाथ मारायला क्षणाचाही विलंब लागणार नाही - उद्धव ठाकरे

  Mumbai
  सत्तेला लाथ मारायला क्षणाचाही विलंब लागणार नाही - उद्धव ठाकरे
  मुंबई  -  

  सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. नाशिकमधील कृषी अधिवेशनामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गालाही उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्ग कशाला पाहिजे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

  उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे -

  • सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही

  • कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देतो

  • कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळ करंटे नाहीत

  • एका महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून विधानसभेवर मोर्चा न्यायचा आहे

  • कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढे बघू

  • शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्ग नको

  • सत्ता आल्यावर भाषा बदलणारे आम्ही नाही

  • आता मन की बात नाही, शेतकऱ्याची बात करा

  • आता यापुढे माझा शेतकरी रडणार नाही, रडवणार

  • मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करून नाही

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा काय?

  • रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली

  • शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणणाऱ्यांची साले काढतील

  • सरकारने तूर घोटाळा केला. तुरीचे बंपर पीक येणार माहित असताना तूर आयात केली

  • विदेशातून काळा पैसा आणून देणार होते. त्याचे काय झाले? ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा!

  • ज्या शेतकऱ्याला मुळात इन्कमटॅक्स नाही त्याच्याकडे काळा पैसा कुठुन येईल?
   कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्यांना 15 लाख रुपये द्या

  • मुख्यमंत्री विरोधात असताना कर्जमाफी मागायचे. आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये रूपांतर झाले. सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही?

  • मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्जमुक्त करा, माझे सर्व मंत्री तुम्हाला पाठिंबा देतील

  • कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू

  • मी आंदोलन शब्द वापरत नाही, मला वणवा भडकवायचा नाही

  • एक महिना चालणाऱ्या शिवसेनेच्या अभियानामध्ये प्रत्येक शेतकरी उतरला पाहिजे

  • माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, फक्त साथ देऊ शकतो, शेतकऱ्याला साथ द्यायला आलो आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.