'केंद्रात काय तुमची गाढवं बसवली आहेत का?'

 Kandivali
'केंद्रात काय तुमची गाढवं बसवली आहेत का?'

कांदिवली - 'केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसवली आहेत का?” असा घणाघाती सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांना केला आहे. केंद्राने अहवालात मुंबईबद्दल स्पष्ट उल्लेख केला आहे. अहवाल केंद्राचा आहे, मग मुख्यमंत्री कशाला खोटं बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. केंद्राच्या अहवालावरच विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसवली आहेत का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.

 

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. मुंबईचा पाटणा केला आहे, असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचा अपमान केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, मुंबईचं आम्ही पाटणा केलं असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Loading Comments