उद्धव ठाकरे म्हणाले, आज पूर्ण राज्यभर आंदोलन झाले. शासनाच्या जीआरची ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मुंबईत पत्रकार संघासमोरील प्रांगणात मी आंदोलनात सहभागी झालो. मला अभिमान आहे की मराठी माणसांच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. अशीच शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी दिसली होती. तेव्हाही त्यांचा डाव उधळला होता, आजही उधळला.
आजही मला वैषम्य वाटते, मराठी माणसांची एकजूट तोडण्याचे काही जणांकडून प्रयत्न सुरूच आहेत. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी छान भूमिका घेतली की हिंदीला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. मराठी-अमराठी वाद निवडणुकीच्या तोंडावर सरकारला उभा करायचा होता, पण मराठी माणसाने तो हाणून पाडला.