Advertisement

शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभा असलेला पक्ष शिवसेना - उद्धव ठाकरे


शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभा असलेला पक्ष शिवसेना - उद्धव ठाकरे
SHARES

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून होणाऱ्या वादाचे जे राजकारण करत आहेत त्यांना ते करू देत. पण शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे नेहमी ठामपणे उभा राहणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता शिवसेनेचा हात नाही तर, संपूर्ण पाठिंबा आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. 19 जून रोजी षण्मुखानंद येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेता मनोहर जोशी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या वर्धापन दिनाचा तोच उत्साह शिवसैनिकांमध्ये दिसत आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेली ही परंपरा अशीच सुरू राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत यांचे नाव बैठकीत सुचवले होते. जर कोणालाही याचा विरोध असेल तर, तो का आहे हे सांगावं. केवळ मतांच्या राजकारणाखाली राष्ट्रपती पदासाठी नाव देत असाल तर, ते करू नये असा टोला देखील उद्धव यांनी नरेंद्र मोदींना लगावला.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement