Advertisement

शेतकऱ्यांना दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी पाळला

शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला मंचासमोर जवळ उभं करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

शेतकऱ्यांना दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी पाळला
SHARES

दुष्काळग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द तंतोतंत पाळत, त्यांना शपतविधीला विशेष आमंत्रण दिले आहे. जत तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी विठ्ठलाचरणी साकडे घालत, सेनेचा मुख्यमंत्री शपत घेताना पाहण्याची इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. त्यानुसार शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी त्या दांपत्यासह तब्बल ७०० शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी शपतविधीसाठी आमंत्रण पाठवत आपला शब्द पाळला.

हेही वाचा - ठरलं! राज ठाकरे शपथविधीला जाणार

सांगलीच्या जतमधील शेतकरी दाम्पत्याला ठाकरे यांनी मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हे दाम्पत्य मुंबईला रवाना झाले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शेतकरी आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, ५ दिवस निरंकार उपवास करत ८५  किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला हे दोघे पंढरपूरला गेले होते. यादरम्यान, उद्धव ठाकरे १५  नोव्हेंबरला सांगलीमधील खानापूर, कडेगावमधील पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कडेगाव तालुक्यात सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते. यावेळी संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला मंचासमोर जवळ उभं करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

हेही वाचाः- ‘हे’ ६ नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ

त्यावर उद्धव ठाकरे यांनी लगेच तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजजवळ का मंचावर उभं करतो, असे आश्वासन दिले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने आज पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सावंत दाम्पत्याला मातोश्रीवरून निमंत्रण आले आहे. मात्र त्याच बरोबर उद्धव ठाकरेंनी आत्महत्याग्रस्त ७०० शेतकऱ्यांना ही शपतविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. शपतविधीला येणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा