Advertisement

महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचा मुंबईतील 22 जागांवर दावा

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचा मुंबईतील 22 जागांवर दावा
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुंबईत फारशा जागांची अपेक्षा नाही. मुंबईतील पाच ते सहा जागांवर त्यांनी भर दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत आगामी विधानसभेच्या जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मुंबईच्या वादग्रस्त जागा दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते ठरवतील.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मुंबईत शिवसेना ठाकरे गटानंतर काँग्रेस सर्वात मजबूत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने मिळून काही मतदारसंघांवर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत वादग्रस्त जागांवर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यास ते मान्य होईल, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या सात जागांवर राष्ट्रवादीचा पवार गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांना केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी जागावाटप लवकर केले जाणार आहे.



हेही वाचा

एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव : संजय राऊत

महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नाही?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा