Advertisement

उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

आम्ही सर्वांना शांततेचे आणि संयमाने वागण्याचे आवाहन करत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे (meenatai thackeray) यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

यावेळेस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (shiv sena ubt) यांनी दादरच्या (dadar) शिवाजी पार्क परिसरात त्यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला भेट दिली आहे.

ज्याला आपल्या आईवडीलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा लावारिस माणसाने हे कृत्य केले असावे अथवा बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचा अपमान करून बिहार पेटवण्याचा असफल प्रयत्न झाला तसाच प्रकार महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न दिसतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच आम्ही सर्वांना शांततेचे आणि संयमाने वागण्याचे आवाहन करत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

नवी मुंबई विमानतळाजवळ शिवस्मारक, शिवमुद्रा उभारणार

24 तासांच्या आत पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला शोधा: राज ठाकरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा