Advertisement

बाळासाहेब असते तर, महाविकास आघाडी झालीच नसती- नारायण राणे

केवळ मुख्यमंत्रीपद मिळवायचं या एकाच उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. परस्पर विचारांच्या या पक्षांनी तत्व आणि विचारधारेला मूठमाती देऊन हे सरकार बनवलं आहे.

बाळासाहेब असते तर, महाविकास आघाडी झालीच नसती- नारायण राणे
SHARES

केवळ मुख्यमंत्रीपद मिळवायचं या एकाच उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. परस्पर विचारांच्या या पक्षांनी तत्व आणि विचारधारेला मूठमाती देऊन हे सरकार बनवलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी ही आघाडी होऊच दिली नसती, अशा शब्दांत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

हेही वाचा- हा तर अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रकार, अजित पवारांना क्लीन चीटप्रकरणी फडणवीसांचा आरोप

हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेवर आलेलं नाही. हिवाळी अधिवेशन अवघ्या ५ दिवसांचं भरवण्यात आलं. या अधिवेशनात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक प्रथा, परंपरा या सरकारने गुंडाळून ठेवल्या. एखादा घरगुती कार्यक्रम वाटावा असं हे अधिवेशन होतं. या महाविकास आघाडी सरकारकडे शेतकरी, बेराजगार आणि विद्यार्थ्यांसाठी कुठलाही ठोस कार्यक्रम नाही, असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, गेल्या ५० ते ५२ वर्षांपासून शिवसेना ज्या विचारांवर सुरू होती, त्या विचारांना मूठमाती देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी केलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं, त्यातील भाषा अशोभनीय होती. उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर मला शंका असून राज्याचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेल्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला गरज आहे. अन्यथा महाराष्ट्र प्रगती करू शकणार नाही. इतर पक्षांसोबत आघाडी केली म्हणजे धर्मांतर केलं नाही, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगाव्यात, असं राणे म्हणाले.

हेही वाचा- ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा