शिवसेनेसाठी बीकेसी सोडलं - आशिष शेलार

  Dadar
  शिवसेनेसाठी बीकेसी सोडलं - आशिष शेलार
  मुंबई  -  

  दादर - भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी वसंत स्मृती सभागृहात रविवारी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचा बालहट्ट मोठा भाऊ म्हणून भाजपा पुरवेल. 18 फेब्रुवारीला भाजपा आपली सभा मुंबईतील बीकेसी मैदानाऐवजी सोमय्या मैदानावर घेईल. शिवसेनेसाठी बीकेसी सोडलं," असं स्पष्टीकरण या वेळी शेलार यांनी दिले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रचारसभांचा नारळ फुटला पण आता ते सभेत दिसत नाहीत. हा शिवसेनेचा यूटर्न आहे, असा आरोपही शेलारांनी केला.

  शिवसेना घाबरली आहे म्हणून उद्धव ठाकरे मुलुंडची बॉर्डर सोडून ठाणे, पुणे, नाशिक, अकोला या महापालिकांच्या प्रचाराला जात नाहीत. मुंबई सोडून जाण्याची त्यांची हिंमत नाही. मी बॉस आहे ही सांगण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, अशी टिकाही शेलार यांनी व्यक्त केली.

  उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना 23 फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाचा महापौर पंतप्रधानांच्या उपस्थितीत बसणार आहे. हे काम उद्धव यांनी चांगले केले असा टोला शेलारांनी लगावला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.