Advertisement

पुन्हा शिवसैनिक आठवले


पुन्हा शिवसैनिक आठवले
SHARES

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा आपल्या शिवसैनिकांची आठवण आली आहे. “माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदाधिका-याचा माध्यम म्हणून वापर करण्याची गरज नाही. मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध आहे. माझ्याशी थेट संपर्क साधा.’’ अशी हक्काची साद त्यांनी घातली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव यांनी आपल्या शिवसैनिकांना अशीच साद घातली होती. त्यानंतर पाच वर्षांनंतर असा ‘योग’ आलाय. शिवसेना विभाग, उप विभागप्रमुख, शाखा आणि उप शाखा प्रमुखांना नुकतंच शिवसेनाभवनात पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलं. पक्षात मोठे फेरबदल करण्याची स्पष्टोक्ती करताना नव्या शिवसैनिकांमधून पदाधिकारी निवडले जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. हे करत असताना उपस्थित स्थानिक पदाधिका-यांमधली आशेची धुगधुगी वाढवण्याचं कामही त्यांनी केलं. उद्धव यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पदाधिका-यांचा स्पष्ट नामोल्लेख करत पक्षात कुणाचाही ‘आदेश’ चालू देणार नाही, हे पक्षप्रमुखांनी ठसवून दिलं. ‘मातोश्री’ च्या अंगणात वाढलेले ‘वकील’ असोत किंवा प्रशासनावर पकड असलेले पक्षाचं दिल्लीत प्रतिनिधीत्व करणारे धोरणी व्यक्तिमत्त्व, आपल्यावर कुणाचाही प्रभाव ‘निल’ म्हणजे नगण्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट करुन टाकलं.

संघटनात्मक फेरबदलात नवी फळी तयार करत असताना सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिका-यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल का? हा प्रश्न आहेच. सध्या शिवसेनेत पडद्यामागून वजीराची भूमिका बजावणा-या दोघांना किंवा दोघांपैकी एकाला पक्षात महत्त्वाच्या पदावर नेमलं जाईल, अशी माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा