नाव न घेता उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका

 नाव न घेता उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका
See all
मुंबई  -  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांच्यावर नाव न घेता पहिल्यांदा राणेंच्या पक्षांतराच्या चाचपणीबाबत टीका केली. "विरोधी पक्ष आमच्यावर टीका करतात की, आम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाही? आमचं सोडा... तुमच्याबद्दल बोला ना. तुमचे किती नेते भाजपात जाणार आहेत? शिवसेनेवर आरोप करणारे गुप्त बैठका करतात. अमित शहांना भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटायचे आणि बाहेर येऊन शिवसेनेवर आरोप करायचे की, हिंमत असेल तर सत्तेमधून बाहेर पडा. कुठच्या पक्षात आहात ते लक्षात ठेवा. अर्धे भाजपात निघून गेले आहेत" असा टोला उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला.

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाबद्दल भाष्य करण्याचे टाळले होते. "दोघांनाही शुभेच्छा" असे मार्मिक उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र बुधवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये नाव न घेता त्यांनी नारायण राणेंवर टीका केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.