Advertisement

14 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा, विरोधकांना मिळणार प्रत्युत्तर

पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार आहेत.

14 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा, विरोधकांना मिळणार प्रत्युत्तर
SHARES

शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत येत्या 14 मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार आहेत.

मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.

भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या सभेत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावर असतील. भोंग्याच्या मुद्द्यांवर राज ठाकरेंना तर महापालिकेतल्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीसांना मुद्देसूद उत्तर देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, या सभेचा टिझर शिवसेनेने रविवारी टि्वटवरून जाहीर केला आहे. अवघ्या १५ सेकंदाच्या या टिझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत. तर साहेबांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्त्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असे आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.हेही वाचा

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

mumbai"="" target="_blank">Mumbai Political News">मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी - बाळा नांदगावकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा