मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकिचे पत्र आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरेंसोबतच बाळा नांदगावकर यांनाही धमकिचे पत्र आले आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेतली.
बाळा नांदगावकर म्हणाले की, पत्रातली भाषा ही उर्दू आहे. तसंच पत्रात मशिदिंवरील भोंग्यांविरोधात सुरू केलेले आंदोलन थांबवावेत असंही म्हटलं आहे. हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही असे नांदगावकरांनी सांगितले. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण मंहाराष्ट्र पेटून उठेल.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली असून गृहमंत्री याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बोलले असल्याचे नांदगावकरांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. प्रत्यक्षात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्रात मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा