Advertisement

उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यालयाला मनसेचा विरोध नाही

बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून मनसेचा उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यालयाला विरोध नसल्याचं पाहायला मिळतंय.

उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यालयाला मनसेचा विरोध नाही
SHARES

उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांसाठी लवकरच मुंबईत कार्यालय सुरू केलं जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून मनसेचा उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यालयाला विरोध नसल्याचं पाहायला मिळतंय.  

बाळा नांदगावकर म्हणाले की, “मला असं वाटतं की त्यांनी उघडण्यात अडचण काय? तुम्हाला कल्पना आहे का, अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऑफिस उघडले आहे ते. अयोध्येमध्ये प्रॉपर. कुणाला तरी अयोध्येला पाठवा आणि माहिती घ्या. अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऑफिस उघडलेले आहे. ऑफिशयली तिकडे लोकं बसतात. तिकडे कार्यकर्ते तयार होत आहेत. आम्ही कोण भेटलो पण नाही. पण कार्यकर्त्यांची मागणी आलेलली आहे तिकडून.”

मुंबईत (Mumbai) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी केली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा यापूर्वी उत्तर भारतीयांच्या मुंबईत वाढत्या लोकसंख्येला विरोध होता. पण आता राज ठाकरे यांची भूमिका बदल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) राहणाऱ्या उत्तर भारतीय समाजाच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकार मुंबईत नवीन कार्यालय सुरू करणार आहे. या कार्यालयाद्वारे मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारे उत्तर प्रदेशातील रहिवासी त्यांच्या राज्यात गुंतवणूक करू शकतात. तसंच सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करू शकतात.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील यूपी सरकारने (UP Government) प्रस्तावित केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून, यूपीमधील सर्व रहिवाशांशी संपर्क साधू शकतात. नोकरी किंवा व्यवसायासाठी दीर्घकाळ मुंबईत राहत आहेत किंवा जे शोधात आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरेल. दरवर्षी रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्या आणि पुन्हा उत्तर प्रदेशात पुन्हा जाणाऱ्यांसाठीइथं स्रव प्रकारची मदत उपलब्ध होईल.



हेही वाचा

मुंबईत उत्तर भारतीयांसाठी योगी सरकार कार्यालय उभारणार

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा... भाजप खासदाराचं चॅलेंज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा