Advertisement

उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा राजकारणात येण्याच्या रंगल्या चर्चा

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या वाद पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा राजकारणात येण्याच्या रंगल्या चर्चा
SHARES

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या वाद पाहायला मिळत आहे. परवानगी नाही मिळाली तरी शिवतीर्थावरच मेळावा घेऊ असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.  

तर दुसरीकडे शिवसेनेने दसरा मेळाव्याचे बॅनर लावले असून यामुळे पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. दसरा मेळाव्याचं औचित्य साधत ठाकरे कुटुंब आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच गद्दारांना क्षमा नाही...!, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून झळकवण्यात आले

पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेत झालेली अभूतपूर्व बंडाळी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.



हेही वाचा

मनसेला एनडीएमध्ये घेण्यास ‘या’ नेत्याचा विरोध

बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला मंजुरी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा