चेंबुरमध्ये मामा-भाच्यामध्ये थेट टक्कर

 Chembur
चेंबुरमध्ये मामा-भाच्यामध्ये थेट टक्कर
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - सिद्धार्थ कॉलनी परिसरातल्या प्रभाग क्रमांक 152 मधून निवडणुकीच्या रिंगणात मामा- भाचे आमने सामने उभे आहेत. याच परिसरात राहणारे विशाल मोरे हे भारिप मधून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा भाचा श्रीकांत उबाळे हा याच प्रभागातून त्यांना अपक्ष म्हणून टक्कर देत आहे.

विशाल मोरे हे या परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत मोठया प्रमाणत तरुण वर्ग आहे. भाच्यासोबत त्यांची लढाई नसली तरी या प्रभागातून भाजपाच्या आशाताई मराठे, शिवसेनेच्या ललिता साळवी आणि रिपाइंचे सुनील बनसोडे यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे.

Loading Comments