अबू सालेम मुंबई पालिका निवडणुकीत?

 Mumbai
अबू सालेम मुंबई पालिका निवडणुकीत?
अबू सालेम मुंबई पालिका निवडणुकीत?
अबू सालेम मुंबई पालिका निवडणुकीत?
अबू सालेम मुंबई पालिका निवडणुकीत?
See all
Mumbai  -  

वाकोला - निवडणूक ही निर्भयी वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोग नेहमीच प्रयत्नशील असतो. या काळात समाजकंटकांना हद्दपार देखील केलं जातं. मात्र वाकोला परिसरात घडलेल्या एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेस अल्पसंख्याक पक्षाचे नॉर्थ सेंट्रल जिल्हाध्यक्ष कय्युम तांबोळी यांना चक्क एका गँगस्टरकडून धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विरोधात कय्युम यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

गुरुवारी वाकोल्यातील नेहरू रोडवर असताना अचानक तीन जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी 'बॉसच्या परवानगीशिवाय काँग्रेस पक्षाचा प्रचार करायचा नाही, जेव्हा बॉस सांगतील तेव्हाच प्रचार करायचा. नाही तर तुला बघून घेऊ' अशी धमकी दिली. अबू सालेमसारखे अंडरवर्ल्ड गँगस्टर पालिका निवडणुकीत अॅक्टिव्ह असल्याचा आरोप तांबोळी यांनी केला आहे. दरम्यान, या धमकीमागे विरोधी पक्षांचा हात असल्याची देखील शक्यता वर्तवली जातेय.

Loading Comments