Advertisement

'समान नागरी कायदा काळाची गरज'


'समान नागरी कायदा काळाची गरज'
SHARES

दादर - भारतीय घटनेच्या 44 व्या कलमानुसार गेली अनेक वर्षे समान नागरी कायदा या विषयावर वेगवेगळ्या स्तरावर चर्चा होत आहे. जाती, पंत, वंश, धर्म कोणताही असो मात्र समाजात समान नागरी कायदा असणे काळाची गरज आहे, असं अॅड. गणेश सोवनी म्हणाले. सामान नागरी कायदा अवश्यकतेच्या अनुषंगाने पुन्हा सुरू झालेल्या चर्चेमुळे हा कायदा का हवा असून त्याची समाजाला भासणारी काळाची गरज यावर विविध स्पष्टीकर त्यांनी दिलं. दादर पूर्व येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या गुरुवार सभेत ते बोलत होते.
सामान नागरी कायदा ही केवळ अल्पसंख्यांकांसाठीच नव्हे तर बहू संख्यांकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या सामान कायद्यासाठी 'लॉ कमिशन ऑफ इंडिया वेब साइट'वरील प्रश्नावलीत आपल्या प्रतिक्रिया 21 नोव्हेंबर पर्यंत नोंदवा. तसंच प्रश्नावलीतील मुद्दे चुकीचे वाटल्यास त्यात कोणते बदल हवेत यावर देखील मत मांडता येईल असं सोवनी यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा