Advertisement

पियुष गोयल यांच्यावर अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा


पियुष गोयल यांच्यावर अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. अरुण जेटली यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत त्यांच्याकडे असलेला अर्थमंत्रिपदाचा भार आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रायलयासोबतच अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा सांभाळावी लागणार आहे.


तोपर्यंत ही जबाबदारी गोयल यांच्याकडे

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नुकचीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता अरुण जेटली पूर्णपणे फिट होईपर्यंत अर्थ मंत्रालयाचा कारभार पियुष गोयल सांभाळणार आहेत.

स्मृती इराणींना धक्का

याचबरोबर पंतप्रधान मोदींनी स्मृती इराणी यांच्याकडे असलेलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय काढून घेत त्यांच्याकडे असलेलं वस्त्रोद्योग मंत्रिपद कायम ठेवलं आहे. तर स्मृती इराणींकडील प्रसारण मंत्रिपदाची जबाबदारी केंद्रीय क्रीडा मंत्री  राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा