Advertisement

दिशा सालियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणेंना दिलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयानं दिलासा दिला आहे.

दिशा सालियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणेंना दिलासा
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांना दिंडोशी न्यायालयानं दिलासा दिला आहे. मालवणी पोलिसांनी अटकेची कारवाई १० मार्चपर्यंत करु नये, अशा सूचना दिंडोशी न्यायालयानं दिल्या आहेत.

नारायण राणे आणि नितेश राणे आता मालवणी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून त्यांची बाजू मांडू शकतात. दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता.

यावर नारायण राणे आणि नितेश राणे त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडणार आहेत. 5 मार्चला नारायण राणे त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.

राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता.

सालियन कुटुंबियांनी म्हटलं होतं की, आमच्या मुलीची बदनामी थांबवावी. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

तसंच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या परत परत आरोप करण्यामुळे दिशा सॅलियनची मृत्युनंतर बदनामी होत आहे, असा आरोप शिवसेनेकडून सतत करण्यात येतोय.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दिशा सालियनच्या पालकांनीही माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली होती. आणि दिशाची बदनामी थांबवण्याची विनंती त्यांनी केली होती.



हेही वाचा

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही - अजित पवार

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा