Advertisement

आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण : रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे.

आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण : रामदास आठवले
SHARES

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असं ते म्हणाले. एवढेच नाही तर मशिदीतील लाऊडस्पीकर काढायला कोणी आलं, तर आपला पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, मी नरेंद्र मोदींसोबत आहे, माझा पक्ष भाजपसोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. मी म्हणालो लाऊडस्पीकर काढण्याबद्दल बोलू नका. जर तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, तर तुम्ही लावू शकता. तुम्ही तुमच्या मंदिरात लाऊडस्पीकर लावू शकता. हनुमान चालिसाचे पठण करू शकता. पण नवे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींमधून ३ मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवावेत, असा अल्टिमेटम दिला आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर मनसे कार्यकर्ते राज्यभरातील मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील, असे ते म्हणाले होते.

धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे, असे राज ठाकरेंनी ट्विट केले होते, त्याचबरोबर राज ठाकरे दुर्दैवाने महाराष्ट्रात योगी नाहीत. पण येथे सगळेच त्रस्त असल्याचे म्हटले आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी

राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा