Advertisement

खडसेंवर अशी वेळ येणं दुर्दैवी, नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मात्र खडसेंसारख्या निष्ठावंतावर अशी वेळ येणं दुर्दैवी असल्याचं मत परखड शब्दांत मांडलं आहे.

खडसेंवर अशी वेळ येणं दुर्दैवी, नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे (eknath khadse) यांना विधान परिषदेची उमेदवारी (vidhan parishad election) न देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं समर्थन करत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मात्र खडसेंसारख्या निष्ठावंतावर अशी वेळ येणं दुर्दैवी असल्याचं मत परखड शब्दांत मांडलं आहे. 

पक्षविस्तारात मोठी भूमिका

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी यांनी एकनाथ खडसे यांची पाठराखण करत त्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'खडसे यांच्यासोबत जे चाललंय ते दु:खद आणि दुर्दैवी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप मोठी आहे. अतिशय प्रतिकूल काळात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. परंतु सद्यस्थितीत त्यांना पक्षाकडून दिली जाणारी वागणूक अत्यंत दु:खद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वा नेत्यावर ही वेळ येणं योग्य नाही. त्याबद्दल मी फक्त दु:ख व्यक्त करू शकतो. त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही, असं असं गडकरी यांनी म्हटलं.

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार

पक्षाने बरंच दिलं

पक्षाने आतापर्यंत खडसे (eknath khadse) यांना बरंच काही दिलं आहे. पक्षासाठी काम करणं म्हणजे मंत्रिपद, खासदारकी, आमदारकी मिळवणं नाही. खडसे यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलं आहे. त्याच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शक म्हणून पक्षाचं काम करावं. खडसेंना पक्षाने एवढं सगळं देऊनसुद्धा ते जाहीरपणे पक्षविरोधात बोलत आहेत. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली नसावी. पक्षातील वाद चव्हाट्यावर मांडणं योग्य नाही. मुंगी होऊन साखर खाणं चांगलं, असा सल्ला पाटील यांनी खडसेंना दिला.

बिनविरोध निवड

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड यांना पक्षाकडून उमेदवारी दिली होती. भाजपचे हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आमदार बनले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा